तळोदा (प्रतिनिधी) – तळोदा शहरातील चिनोदा रस्ता व कचरा डेपो जवळील विक्रम नगर या भागात कचरा डेपो डोकेदुखी झाला आहे. चिनोदा रस्त्यावर बरीचशी व्यापारी आहेत. तसचे विक्रम नगर या भागात शिक्षक, डॉक्टर, नोकरदार, व्यापारी, कष्टकरी वर्गाचा रहिवास आहे. या भागात कचरा डेपोची दुर्गंधी तसेच हवे मुळे कचरा, प्लस्टिक उडून येते. अशा गंभीर समस्यांच्या फेऱ्यात हा परिसर सापडला आहे. या भागातील मुख्य डोकेदुखी आहे. ती कचरा डेपो. म्हणून लवकर कचरा डेपो स्थलांतर करावे असे परिसरातील नागरिकांन कडून बोलले जात आहे.

तळोदा शहरातील सुपूर्ण कचरा गोळा करून येथे टाकला जातो. यामुळे दुर्गंधीयुक्त परिसर म्हणून याकडे बघितले जाते. प्रचंड प्रमाणात दुर्गंधी असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या दुर्गंधीमुळे या रस्त्यावरून जातांना नागरिकांना अक्षरश: नाक-तोंड दाबून पुढे जावे लागते. त्यांची ही अवस्था असताना स्थानिक नागरिकांचे काय हाल असतील त्याची कल्पना न केलेलीच बरे. कच-यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव असून यामुळे मलेरिया, डेंग्यू सदृश्य आदी साथींचे आजारही होण्याची शक्यता आहे. या कचरा डेपोचा जवळ वसाहती आहेत . हवे मुळे त्यांनादेखील दुर्गंधीची मोठी समस्या भेडसावत आहे. यामुळे प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरून या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नगरपालिका प्रशासनाने कचरा डेपो हलवण्याच्या विषयावर सर्वच नगरसेवक व नेते एकत्र बसून विचारमंथन करावे . सर्वसाधारण सभेत कचरा डेपो स्थलांतरचा प्रश्न मांडून पर्यायी जागा शोधून कोणतेही राजकारण न करता ठराव मंजूर करावे. तर शहरात कचऱ्याची समस्या राहणार नाही व हाही शहर विकासाचाच एक भाग आहे, असा विचार करून कचरा डेपो स्थलांतर चा प्रश्न लवकरच मार्गी लावावा असे परिसरातील नागरिकांना कडून बोले जात आहे.







