एरंडोल (प्रतिनिधी ) ;- शेतातून घरी परतत असतांना अचानक वीज कोसळल्याने तळई येथील दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास येथे घडली असून विक्रम दौलत चौधरी वय ५७ रा. तळई ता.एरंडोल यांच्या डोक्यावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत त्याच परिसरात काही अंतरावर असलेल्या तळई शिवारातच भूषण अनिल पाटील वय १८ रा. तळई ता.एरंडोल हा त्याच्या शेतात असताना पाऊस सुरु झाल्याने त्याच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याला एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली . याबाबत कासोदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे,. दरम्यान रमेश कौतिक धनगर वय ६५,निवृत्ती रमेश धनगर वय २७, राहुल झावरु पाटील वय २८ ,संदीप वामन वाघ वय २८ हे देखील जखमी झाले आहेत .