• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

तहसीलदाराला १५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 6, 2023
in Uncategorized
0

नाशिक येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

नाशिक (प्रतिनिधी) – येथील तहसीलदाराला १५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही मोठी कारवाई केली. नाशिक तहसीलदार नरेश कुमार बहिरम हे आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. गौण खनिज प्रकरणातील सव्वा कोटी रुपयांच्या दंडाची रक्कम कमी करण्यासाठी नरेश कुमार यांनी १५ लाख रुपयांची लाच मागितली होती. एकदा झालेला आदेश फेरतपासणीसाठी घेण्यासाठी मागणी करण्यात आली होती.

नाशिक तालुक्यातील राजूर बहुला येथील जमिनीत मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी जवळपास एक कोटी रुपयांची दंड आकारणी केली. याविरोधात जमीन मालकाने थेट उपविभागीय कार्यालयात अपील दाखल केले. या प्रकरणाची फेर चौकशीसाठी तहसीलदार बहीरम आले असता त्यांनी १५ लाख रुपयांची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत कळविल्यानंतर बहिरम यास लाच घेताना अटक केली.

नाशिक तालुक्यातील राजुर बहुला येथील जमिनीमध्ये मुरुम उत्खननाबाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम १ कोटी २५ लाख ६ हजार २२० याप्रमाणे दंड आकारणी केल्याबाबत संशयित यांच्या कार्यालयाकडील आदेश आले होते. त्या आदेशाविरुद्ध जमिनीच्या मालक यांनी नाशिकच्या उपविभागीय कार्यालयात अपील दाखल केले होते. त्याबाबत आदेश होऊन सदरचे प्रकरण फेर चौकशीसाठी तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्याकडे पाठवण्यात आले होते.

सदर मिळकतीमधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर झाल्याच्या जमिनीच्या मालक यांनी स्पष्ट केले होते. जमीन मालकाने सांगितल्यानुसार याच्या पडताळणीसाठी संशयित बहिरम यांनी जमिनीच्या मालकांना त्यांच्या मालकीच्या राजुर बहुला येथे स्थळ निरीक्षणसाठी बोलावले होते. परंतु जमिनीचे मालक वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी निरीक्षणासाठी पाठवले. त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती १५ लाख रुपयांची लाच स्वरूपात मागणी केली. सदरील लाच मागणी केल्याचे पडताळणी पंचनामा वेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच मागणी केलेली लाचेची रक्कम आज स्वीकारल्याने संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Tags: #nashik news #maharashtrahttps://kesariraj.com/tahsildarala-lach-ghetana-atk/
Previous Post

युवा मानसशास्त्रावर जळगावात १२ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय परिषद

Next Post

सर्पदंशाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, पाचोरा तालुक्यातील घटना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सर्पदंशाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, पाचोरा तालुक्यातील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
1xbet russia

किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

June 19, 2025
एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन
1xbet russia

एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन

June 19, 2025
वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सरकारी दिलासा : २ दिवसांत ८ लाख रुपयांची शासकीय मदत जमा
1xbet russia

वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सरकारी दिलासा : २ दिवसांत ८ लाख रुपयांची शासकीय मदत जमा

June 19, 2025
मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण
1xbet russia

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

June 19, 2025
एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन

एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon