जी व्यक्ती असमविभागी अर्थात आपल्याकडील असलेली बाब सारख्या प्रमाणत न वाटणे किंवा आपल्या वाट्याला अधिक ठेऊन घेणे असे असमविभागी असतात. दसवे कालिन सूत्रात दिलेल्या चरणाचा संदर्भ घेत ‘अर्थ’, ‘अनर्थ’, ‘स्वार्थ’ आणि ‘परमार्थ’ या संकल्पना शासन दीपक परमपुज्य सुमित मुनीजी महाराज साहेब यांनी आजच्या प्रवचनातून समजावून सांगितल्या. धार्मिक व व्यावहारीक कार्यात स्वार्थ येऊ देणार नाही, स्वार्थ सोडून परमार्थ स्वीकार करू असा संकल्प घ्यावा असेही सांगितले.
स्वार्थ यामुळे रामायण आणि महाभारत घडले. आपला मुलगा भरत याला राज्यपद मिळावे आणि राम यांना चौदा वर्ष वनवास मिळावा असे वर राणी कैकईने राजा दशरथ यांच्याकडे मागून घेतले. हा कैकेईचा स्वार्थ तर, सुतचा तोडाभर देखील जमीन पांडवांना देणार नाही हा दुर्योधनाच्या मनात स्वार्थ असल्याने महाभारत घडले. स्व चा विचार म्हणजे स्वार्थ तर सर्व चा विचार म्हणजे परमार्थ! आज स्वार्थामुळे परिवार तुटत आहेत. आजही मंदिरात जाताना कुठला तरी स्वार्थ मनात दडलेला असतो, दान करताना देखील आपली प्रसिद्धी होईल, चार चौघे आपल्याला चांगले म्हणतील हा स्वार्थ असतो. स्वार्थ व परमार्थ ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी राजा श्रेणिक यांची कथाही यावेळी परमपुज्य महाराज साहेबांनी सांगितली. कुठल्या चमत्काराने नराचा नारायण बनत नसतो, सम्यकत्व प्राप्त केले तर नराचा नारायण बनतो. याबाबतचे विवेचन परमपुज्य भुतीप्रज्ञ महाराज यांनी आजच्या प्रवचनात केले.