जळगावातील केंद्रीय विद्यालय येथे उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : येथील केंद्रीय विद्यालय येथे “स्वच्छता ही सेवा पखवाडा” साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्याअंतर्गत विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छ करून पंधरवड्याला सुरुवात केली. यावेळी शिक्षक वृंदांनीही सहभाग घेतला.
प्राचार्य सोना कुमार यांनी सांगितले की, “स्वच्छता पखवाड्याचा उद्देश हा आहे की मनासोबतच आपले शरीर आणि आपल्या सभोवतालचे वातावरण स्वच्छ असावे जेणेकरून आपल्या आरोग्याला कोणतीही हानी होणार नाही. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूचे पर्यावरण व परिसर स्वच्छ ठेवू अशी शपथ घेतली. ही शपथ पूजा हिच्या हस्ते देण्यात आली. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. शाळेच्या सीसीए विभागाच्या प्रमुख अनिता दुहन यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.