जामनेर ( प्रतिनिधी ) – स्व पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांप्रमाणे गरिबांची सेवा करा असा सल्ला आज आमदार गिरीश महाजन यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला

आज स्वर्गीय पंडीत दिनदयाल उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमीत्त विनम्र अभिवादन आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी करण्यात आले .यावेळी आमदार गिरीश महाजन पुढे म्हणाले की , भाजपा आगामी काळात महासत्ता म्हणून पुढे येणार आहे निस्वार्थपणे पंडीतजीनी देशासाठी , गरीब नागरीकासाठी काही केल पाहीजे , विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहचल्या पाहीजे हा विचार ठेवून कार्य केले . त्यांनी रुजवलेल्या बीजाचा आज वटवृक्ष झाला आहे . त्यांनी घेतलेल्या त्या काळच्या मेहनतीमुळे आपण आज भाजपा नेते, पदाधिकारी , कार्यकर्ते म्हणून मिरवत आहोत , असेही ते म्हणाले .
यावेळी नगराध्यक्षा सौ साधना महाजन , उपनगराध्यक्ष प्रा शरद पाटील , गटनेते डॉ प्रशांत भोंडे , नगरसेवक बाबुराव हिवराळे , जितेंद्र पाटील , उल्हास पाटील , जे के चव्हाण , दिपक तायडे , दत्तात्रय सोनवणे , सुहास पाटील , आतिष झाल्टे , छगन झाल्टे , जितू पाटील , कैलास पालवे , दिपक तायडे यांच्या सह भाजपा पदाधिकारी , कार्यकर्ते हजर होते.







