जळगाव (प्रतिनिधी) – राज्याने शाळा बंद पण शिक्षण चालू उपक्रम हाती घेतला, हे कौतुकास्पद आहे. पण सर्व ठिकाणी स्थानिक प्रशासनाने शिक्षकांना कामात गुंतवले आहे. हे पण शिक्षणविभागाने लक्षात घ्यावे. संपूर्ण महाराष्ट्र रेडझोन मध्ये असतांना शिक्षक कामे करीतच आहे.प्रतिकूल परिस्थितीही ऑनलाईन – ऑफलाईन शिक्षण सुरु आहे.
२४ सप्टेंबर ला शिक्षण संचालक पुणे यांनी शिक्षक कोणत्या माध्यमातून काय शिकवताय याचा आढावा घेण्यासाठी माहिती संकलन करून पोर्टल वर भरणे शिक्षण विभागाने बंधनकारक केले आहे. आमचे म्हणणे आहे आढावा घ्या पण आधी शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करा. कोविड ड्युटीतून त्यांना मुक्त करावे. त्यांना नव्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेतून त्यांना वगळावे. बी.एल.ओ.ची कामे रद्द करावी. अशी शिक्षकांची मागणी, भाजप शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष यांनी शिक्षण संचालक पुणे यांचे कडे केली आहे. या आधीच शिक्षक एप्रिल पासून घरोघरी जाऊन माहिती घेणे, टोलनाक्यावरील, रेशन दुकानावरील ड्युटी, दारू दुकानावरची हि काम सुटली नाहीत. आणि आता एस.सी.आर.टी.च्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक, ज्युनिअ र कॉलेजातील शिक्षकांना उपक्रमांची माहिती राज्यसरकारला उपलब्ध करून दिलेल्या लिंक च्या माध्यमातून शिक्षक निहाय ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षकांनी सादर करायची आहे. या साठी सगळ्यात आधी शिक्षकांनी लिंक वर जाऊन स्वतःची नोंदणी करून शिक्षक, शाळा, केंद्र, तालुका, जिल्हानिहाय, अहवाल नोंद ठेवायची आहे. हा तर शिक्षकांवर अविश्वास आहे. शाळा नियमित असतांना असा अहवाल घ्यावासा वाटला नाही. व आत्ताच शिक्षण विभागाला असे का वाटते ? मग या अशैक्षणिक कामांचे काय. त्यातून मुक्तीचे आदेश निर्गमित व्हावे. व या पुढे अशैक्षणिक कामे कमी करूनच शैक्षणिक कामे वाढवावी.अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष शिक्षक आघाडी जळगाव प्रविण जाधव, यांचे सह पदाधिकारी संदीप घुगे, दुष्यंत पाटील, प्रविण धनगर, संजय वानखेडे, परेश श्रावगी, किरण पाटील, के. एस पाटील , पी एल हिरे, आनंद पाटील, आर एल निळे, राजेश इंगळे, विशाल पाटील यांनी केली आहे.