पुणे ( प्रतिनिधी ) – शहरातील आयबीच्या शासकीय निवास्थानामध्ये अंघोळ करणाऱ्या महिलेचे बाथरूमच्या खिडकीतून सुरक्षा रक्षकाने फोटो काढले याबाबत 26 वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली फोटो काढणाऱ्या सुरक्षारक्षकाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली अशोक तुकाराम चव्हाण (वय 26 ) असे त्याचे नाव आहे.
घटनेच्या दिवशी फिर्यादी महिला आयबीच्या गेस्ट हाऊसमधील आपल्या खोलीत दुपारी आंघोळ करीत होती. यावेळी गेस्ट हाऊसवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा अशोक चव्हाण बाथरूमच्या खिडकी जवळ गेला. त्याने फिर्यादीचे खिडकीतून अंघोळ करतानाचे फोटो काढले व व्हिडिओही शूट केला. मात्र बाथरूमच्या खिडकी बाहेर महिलेला संशयास्पद हालचाली जाणवल्या, हा प्रकार त्यांच्या लक्षात येताच, त्यांनी आरडाओरडा केला. त्यांच्या आवाजाने आजूबाजूचे लोक धावत आले व त्यांनी आरोपी अशोकला रंगेहात पकडले. लोकांनी त्याला बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात दिले.