सीबीआय जाणून घेत आहे गुन्ह्याची व्याप्ती !
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगावात सीबीआयचे पथक तळ ठोकून आहे. ॲड. प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात दाखल असणाऱ्या खटल्यांवर सीबीआय अधिकारी हे फिर्यादीचे जबाब घेत आहे. बुधवारी दि. १८ रोजी सीबीआयने चाळीसगाव येथील दाखल गुन्ह्यात सूरज सुनील झंवर यांचा जबाब नोंदवून घेत आहे.
सीबीआयकडून सूरज झंवर यांचेकडून आज चाळीसगाव येथे दाखल फिर्यादींविषयी चौकशी करण्यात आली. त्यात रात्री उशिरापर्यंत सूरज सुनील झंवर यांच्याकडून माहिती घेऊन जबाब नोंदविण्यात येत आहे. त्यात, घटनाक्रम पूर्णपणे जाणून घेत या घटनेची व्याप्ती किती आहे हे जाणून घेण्याचा सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला आहे. दरम्यान, सीबीआयचे पथक जळगावात तळ ठोकून असल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे.
मंगळवारी जळगावला दाखल फिर्यादींबाबत निलेश भोईटे यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. दरम्यान, गुन्ह्यात असणारे संशयित आरोपी हे अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविली जात असून याबाबत ॲड.प्रवीण चव्हाण यांच्यावर भविष्यात काय कारवाई होईल याकडे विविध क्षेत्रातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.