जळगाव शहरातील ट्रान्सपोर्ट नगर येथील घटना, आमोदा गावावर शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील ट्रान्सपोर्ट नगर येथे खोली घेऊन राहत असलेल्या तरुणाने छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दि. १७ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजता उघडकीस आली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयूर उर्फ जयंत संजय पाटील (वय २८ रा. आमोदा ता. यावल, ह.मु. ट्रान्सपोर्ट नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. मयूर पाटील यांच्या पश्चात आई-वडील, बहिण असा परिवार आहे. ते एमआयडीसीमधील गीतांजली केमिकल कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला होते.(केसीएन) दरम्यान गुरुवारी दिनांक १७ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेपर्यंत ते त्यांच्या मित्रांशी फोनवर बोलत होते. त्यानंतर मात्र मित्रांशी त्यांचा संपर्क आला नाही.
एका मित्राला शंका आली म्हणून त्याने मयूर पाटील यांच्या खोलीवर जाऊन त्याला भेटण्याचा प्रयत्न केला असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. मयूर पाटील याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.(केसीएन)एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केल. तसेच घटनेची पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मयूर पाटील याने आत्महत्या का केली याबाबत कारण समजून आले नाही. मयूरच्या मृत्यूमुळे आमोदा गावावर शोककळा पसरली आहे.