जळगावातील सुप्रीम कॉलनी येथील घटना
कैलास जिंदल राठोड (वय ३४, सुप्रीम कॉलोनी, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. पत्नी, २ मुले, १ मुलगी यांच्यासह तो सुप्रीम कॉलनीत राहत होता. मजुरी काम करीत परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.(केसीएन) रविवारी कैलास याची पत्नी माहेरी गेली होती.आई गुजरात येथे गेलेली आहे. घरी कोणी नव्हते. दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास कैलासने राहत्या घरी छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. शेजाऱ्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी जवळच राहणारा पुतण्या शुभम राठोड याला सांगितले. त्याने तातडीने येऊन पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून कैलास याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला.(केसीएन) एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कैलास राठोड याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.