सुप्रीम कॉलनी येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात राहणारे मुन्ना चंदू राठोड (वय ६५) यांनी मंगळवारी दुपारच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.









