जळगाव (प्रतिनिधी ) ;- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज खा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमीत्त जळगाव शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . जिल्हा कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेचआरोग्य शिबीर,समता नगरातील महिलांना १ लाख रुपयांचे विमा संरक्षण , काँग्रेस भवनातील महात्मा गांधी वाचनालयात ११ हजार रुपये किंमतीचे पुस्तके वाटप,पार्वती नगर येथे वृक्षारोपण यासह अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज जळगाव शहर महानगर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकिय व आयुष हॉस्पीटल यांच्या सहकार्याने .खा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन ३० जून रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत आरोग्य तपासणी शिबीर, साधना माध्यमिक विद्यालय, पिंप्राळा, हुडको, जळगांब येथे शहरातील व बाहेरील तज्ञ डॉक्टरांकडून मोफत भव्य आरोग्य तापसणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर , जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणीताई खडसे , उत्तर महाराष्ट्र विभागीय महिला उपाध्यक्ष कल्पनाताई पाटील, जिल्हा महानगर अध्यक्षा मंगलाताई पाटील , महानगराध्यक्ष अभिषेक पाटील ,महानगर सचिव अँड. कुणाल पवार, महानगर युवाध्यक्ष स्वप्नील नेमाडे, अशोक लाडवंजारी, रिजवान खाटीक,ममता तडवी, आशा अंभोरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य तपासणी शिबीरासाठी राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन पाटील , डॉ. अशोक पाटील यांचे सहकार्य लाभले.