जळगाव (प्रतिनिधी) – आमदार चंदूलाल पटेल यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ वर्षभराने संपणार असून आता या जागेवरील समीकरणे समोर येऊ लागली आहे. यात महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांना महाविकास आघाडीकडून संधी मिळण्याची शक्यता सुत्रांकडून कळली आहे. भाजपला दणका देण्यासाठी महाजन जे महाविकास आघाडीसमोर समोर एक उत्कृष्ट पर्याय राहणार आहे.
चंदूलाल पटेल हे नाव निवडी आधी कोणालाही अवगत नव्हते, मात्र गिरीश महाजन यांनी अचानक प्रस्थापिताना डावलून त्यांना संधी दिली, मात्र उभा संधीचे सोने तर सोडाच लोखंडही आमदार पटेल यांना करता आले नाही, आताही विधानपरिषद आमदार कोण असा प्रश्न सामान्य विचारतात, कुठलेच काम नाही संपर्क नाही, भाजप विरोध वाढत असताना याचा फायदा महापालिकेतील चर्चेतील चेहरा, सामन्यांना परिचित व सर्व सामन्यांचे प्रश्न थेट भिडून सोडवणारे सुनील महाजन यांना होणार आहे. शिवसेनेच्या वरिष्ठांकडे त्यांचा शब्दाला असलेला मान, कामे करण्याची व समस्या सोडविण्याची हुशारी, अभ्यास, शहरातील समाजीकतेची जाणीव अश्या जमेच्या बाजू सुनील महाजन यांच्या आहेत.

जळगाव महानगरपालिकामध्ये सध्या शिवसेनेची सत्ता आहे. तसेच राज्यामध्ये देखील शिवसेना घटक पक्ष असलेली महाविकास आघाडी सत्तेवर आहे. जळगावात सप्टेंबर २०२२ रोजी विधानपरिषदेचे आमदार चंदूलाल पटेल यांची मुदत संपणार आहे. त्यामुळे विधानपरिषदेवर जाण्यासाठी शिवसेनेचे सुनील महाजन इच्छुक आहेत असे सुत्रांकडून कळते. सध्या विधान परिषदेचे जिल्ह्यात एकूण मतदार ५४२ आहेत. यामध्ये महा विकास आघाडीच्या संपर्कात असलेले मतदार ३०० च्या वर आहेत. त्यामुळे सुनील महाजन यांना विजय मिळण्याची आशा सुत्रांकडून अधिक वाटत आहे. सुनील महाजन यांनी गेली दहा वर्षांपासून जळगाव शहरामध्ये सामाजिक सेवेसह महापालिकेच्या माध्यमातून नगरसेवा देखिल केली आहे.
सुनील महाजन यांची वाढती लोकप्रियता पाहता तसेच विकास कामांकडे पाहण्याचा दृष्टिकोन या मुळे पक्षश्रेष्ठी त्यांना विधान परिषदेचे तिकीट देतील अशी त्यांना अपेक्षा आहे. सुनील महाजन हे सध्या विरोधी पक्ष नेते असले तरी त्यांच्या पत्नी जयश्री महाजन या जळगाव शहराच्या महापौर आहेत. शहरात विकास कामे आणण्यासाठी व विकास कामे मंजूर करण्यासाठी सुनील महाजन हे मंत्रालयात पाठपुरावा करीत असतात. सुनील महाजन हे चतुरस्त्र आणि सर्वपक्षीय लोकप्रिय राजकीय व्यक्तिमत्त्व आहेत.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना यातील पक्षांमध्ये बऱ्यापैकी एकी दिसते. ही एकी कायम टिकण्यासाठी सुनील महाजन हे व्यक्तिमत्व लोकप्रिय आहे. याकरिता सुनील महाजन यांना विधान परिषदेचे तिकीट देणे हे पक्षश्रेष्ठींना सोपे आहे. त्यादृष्टीने पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील व अनुकूलता दर्शवतील अशी आशा देखील सुनील महाजन यांना लागून आहे असे सुत्रांकडून कळते. गेल्या पाच वर्षात विधानपरिषदेचे आमदार असूनही चंदुलाल पटेल यांनी जळगाव जिल्ह्यासाठी फारशी विकास कामे केली नाही. त्यामुळे त्यांची निवड करून भाजप चुकली असा सूर भाजपामधूनच काही महिन्यांपूर्वी उमटला होता. आता तर चंदूलाल पटेल यांच्या मागावर पुणे आर्थिक गुन्हे शाखा आहे, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे निष्कलंक, सामर्थ्यवान, जनसेवेची कामे करणारा असा उमेदवार विधानपरिषदेचा आमदार म्हणून असावा व यासाठी सुनील महाजन हे नाव अतिशय योग्य आहे असे सुनील महाजन समर्थक सांगत आहेत.







