नातेवाईकांचा पोलीस स्टेशनला ठिय्या

पारोळा ;- तालुक्यातील सुमठाणे येथे २२ रोजी शेतीच्या किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. त्यात एका ५० वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी पारोळा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध 302 चा गुन्हा दाखल करा व अटक करा अन्यथा आम्ही प्रेत घेऊन जाणार नाही अशी भूमिका घेत दिवसभर ठिय्या मांडला.
सुमठाणे तालुका पारोळा येथे दिनांक 22 रोजी शेतीच्या बांधाच्या किरकोळ कारणावरून गावातील मनोहर शालिग्राम पाटील, सुनिल शालिग्राम पाटील ,अनिल शालीग्राम पाटील, अक्षय सुनिल पाटील, सुनिल भिकनराव पाटील, गणपत बळीराम पाटील, चेतन सुनिल पाटील, जितेद्र भिकनराव पाटील,अनिल गणपत पाटील, शुभम मनोहर पाटील,अंनता मनोहर पाटील सर्व रा. सुमठाणे ता.पारोळा यांनी सर्जेराव आसाराम पाटील वय 50 रा सुमठाणे यांना काही एक न विचारता लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. काठिने पाठीवर , पायावर हातावर,डोक्यास मारहाण, शिवीगाळ केली होती. त्या दरम्यान त्यांनी अंमळनेर येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना आज त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचे शेव पारोळा पोलिसात आणले व पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडला. आरोपींविरुद्ध खुनाचा 302 गुन्हा दाखल करा व त्यांना अटक करा ही मागणी लावून धरली. यावेळी महिला देखील होत्या जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही शव घेऊन जाणार नाही या भूमिकेवर ते ठाम राहिले. रात्री आठ वाजेपर्यंत यावर कुठलाही तोडगा निघाला नव्हता .
मृताचे शव पोस्टमॉर्टम साठी घेऊन गेले असता त्या ठिकाणीदेखील पोस्टमार्टम करण्यास नकार दिला . त्याठिकाणी देखील ठिय्या आंदोलन मांडले होते.







