जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव येथील वेग वेगळ्या ठिकाणच्या गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम नुकताच संभाजी नाट्यगृहात संपन्न झाला.यावेळी प्रमुख अतिथी सौ. हेमा अमळकर उपस्थित होत्या. त्यांचे स्वागत सुधर्माच्या वतीने सूर्यकांत हिवरकर यांनी अशोक वृक्षाचे रोप देऊन केले. कार्यक्रम प्रास्ताविकात श्री हेमंत बेलसरे यांनी सुधर्माच्या कामाची माहिती दिली.
सौ. हेमा अमळकर यांनी उपस्थित मुलांशी संवाद साधला आपण आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पुढे गेलेच पाहिजे हे स्वतःचे उदाहरण देऊन मुलांना नीट समजून दिले. तसेच पाढे कसे पाठ करावे. दररोजचा अभ्यास वेगळ्या पद्धतीने कसा करावा हे सर्व मुलांना सोप्या भाषेत समजाऊन सांगितले. मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील त्यांनी सोप्या भाषेत दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दप्तर, वही, रंगपेटी, चित्रकला वही,कंपास, पेन, पेन्सिल, शॉपनर इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच बिस्किट, चिवडा, कॅडबरी या खाऊचे वाटप करण्यात आले. सुधर्मा संस्थेचे कार्य अतिशय गौरवास्पद आहे असे मत सौ. हेमा अमळकर यांनी व्यक्त केले. साहित्य मिळाल्याने मुले खूप आनंदात होती.
कार्यक्रमाचे आभार सुधर्माचे वतीने सौ. सुनीता बेलसरे यांनी मानले कार्यक्रमास सावखेडा बुद्रुक, खेडी खुर्द, समता नगर, आंबेडकर नगर,गोपाळपुरा, मन्यारखेडा, तांबापुरा येथील गरजू आणि गरीब विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमा साठी अक्षय जोशी, अमिषा डाबी , स्वाती कुलकर्णी व सुरभी महिला मंडळ यांचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल सोनवणे, नितीन तायडे, शुभम राखपसारे, प्रियंका पवार, सुवर्णा मराठे,नाना चव्हाण, दिनकर बाविस्कर यांनी सहकार्य केले.
सुधर्माच्या कार्यक्रम प्रसंगी शालेय साहित्य वाटप करताना प्रमुख पाहुण्या जळगाव च्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सौ.हेमाताई अमळकर, अध्यक्ष हेमंत बेलसरे सौ सुनीता बेलसरे कार्यकर्ते श्री चौधरी सर आणि सर्व मुले.