पाचोरा ( प्रतिनिधी ) – आंदोलनकर्त्या एस टी कर्मचाऱ्यांना विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व डॉ. भुषण मगर (पाटील) फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. भुषण मगर (पाटील) यांच्या हस्ते काल १०० किराणा किटचे वाटप करण्यात आले.
एस. टी. कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासह विविध मागण्यांसाठी बहुतांश कर्मचारी काही महिन्यांपासुन आंदोलन करीत आहेत . पाचोरा आगारातील चालक, वाहक, यांत्रिक कारागिर यांचेसह सुमारे २०० कर्मचारी लढा देत असुन आंदोलनाच्या काळात अनेक कर्मचाऱ्यांना मानसिक धक्का बसुन जीव गमवावा लागला आहे.
यावेळी नंदु साळुंखे , पाचोरा आगारातील चालक अमृत पाटील, एम. बी. खान, गणेश ठाकरे, आबा कंखरे, वाहक प्रशांत महाले, पुनम राठोड, योगिता पाटील, पुजा गोसावी, ललिता चव्हाण, उद्य पाटील, यांत्रिक कारागिर जाकीर पटवे, जगन्नाथ बोरसे, दिपक पाटील यांच्यासह पाचोरा आगारातील आंदोलनकर्ते चालक, वाहक, यांत्रिक कारागिर उपस्थित होते. कर्मचाऱ्यांनी डॉ. भुषण मगर (पाटील) यांचे आभार मानले. आंदोलनकर्त्यांनी राज्य शासना विरोधात घोषणाबाजीही केली. उर्वरित आंदोलनकर्त्यांना ६ फेब्रुवारीरोजी भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यातर्फे किराणा किटचे वाटप करण्यात येणार आहे.