अमळनेर तालुक्यात धुळे रस्त्यावरील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- भरधाव जाणाऱ्या एस. टी. बसने डंपरला मागून धडक लागल्याने बसचालक व एक प्रवासी जखमी झाल्याची घटना दि. ३ रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास अमळनेर धुळे रस्त्यावर घडली. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरख भगवान पाटील हा डंपर (क्र. एम एच ५४-३५९) ने डिझेल भरण्यासाठी धुळे रोडला जात होता. त्याने आर. के. नगरजवळ गतिरोधक आल्याने वाहन हळू केले. त्याचवेळी अमळनेर-पुणे बस क्रमांक (एम एच १४ एमएच २६८७) ने डंपरला मागून धडक दिली. धडक जोरात बसल्याने एसटी बस चालकाचे पाय केबिन मध्ये अडकले. तर एका प्रवाश्याच्या डोक्याला मार लागला. नागरिकांनी सुमारे पाऊण तासानंतर चालकाचे पाय बाहेर काढले. १०८ रुग्णवाहिकेने त्यांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. डंपरचालक गोरख भगवान पाटील याने अमळनेर पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून बस चालक मनोहर दत्तात्रय पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.