जामनेर तालुक्यात शहापूर धरणाजवळ भीषण घटना
जळगांव (प्रतिनिधी) :- जामनेर तालुक्यात शहापूर धरण परिसरात भरधाव एसटी महामंडळाच्या बसने दिलेल्या धडकेत दुचाकीवर जाणाऱ्या एका वाहकाचा (कंडक्टर) मृत्यू झाल्याची घटना आज दि. २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली आहे. घटनेप्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
ईश्वर अरुण खंडागळे (वय ३३, रा. चिंचखेडा तवा ता. जामनेर) असे मयत वाहकाचे नाव आहे. गावात ते परिवारासह राहत होते. एसटी महामंडळाच्या बसमध्ये कंडक्टर म्हणून सेवा देत ते उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन)सोमवारी दि. २५ रोजी संध्याकाळी त्यांच्या दुचाकीने जात असताना शहापूर धरणाजवळ एसटी बस (क्र. एमएच २० बीएल ३३६०) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ईश्वर खंडागळे हे जागीच ठार झाले.
ग्रामस्थांनी त्यांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी रुग्णालयात मन हेलावणारा आक्रोश केला.(केसीएन)घटनेप्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. ज्यांनी आयुष्यभर एसटी बसद्वारे प्रवाशांची सेवा केली, त्यांचाच जीव अखेर एस.टी. बसच्या धडकेत गेला, अशा शब्दात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेमुळे चिंचखेडा तवा गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.