जळगाव (प्रतिनिधी ) जळगाव आगारच्या दोन बसेसवर दगडफेक करून चालक जखमी झाल्याची घटना पारोळा मूकटी गावाजवळ घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , बस क्रमांक (एमएच 20 BL 4097) ही जळगाव ते धुळे या मार्गावर विच खेडा या गावाजवळ धावत असताना मोटर सायकल क्रमांक 0785 वरील दोन व्यक्तींपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने सदर बसवर दगडफेक फेकून मारला. या दगडफेकीत बसचा समोरील काच फुटून चालक संजय गोविंद रंधे (चालक क्रमांक 2880) यांना दुखापत झालेली आहे.
त्याचप्रमाणे काही वेळातच याच ठिकाणी जळगाव आगाराची दुसरी बस क्रमांक एम एच 20 3381 या धुळे येथून जळगाव जाणाऱ्या बसवर दुपारी 12:45 च्या सुमारास याच मोटर सायकल स्वार व्यक्तींनी दगडफेक केली.
याबाबत पारोळा पोलीस स्टेशन मध्ये संशयित मोटर सायकल स्वार विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूराव पाटील करीत आहेत