भुसावळ शहरात घडली घटना
भुसावळ (प्रतिनिधी ): शहरांतील रेल्वे हेरिटेज गार्डनजवळ एसटी बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले असून, बस चालकाविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी रिझवान हारुण खाटीक (वय ३५, रा. गवळीवाडा, जुना सातारा, भुसावळ) हे दि. ३ फेब्रुवारी रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलने (क्र. एमएच -१९-बीएन १३५) रेल्वे हेरिटेज गार्डनजवळून जात होते. यावेळी वसई ते भुसावळ या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसने (क्र. एमएच १४ एलएक्स ८९२५) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. या भीषण धडकेत फिर्यादी रिझवान खाटीक आणि त्यांच्यासोबत असलेले रफिक सुभान खाटीक (वय ५८) हे दोघेही जखमी झाले आहेत. तसेच मोटारसायकलचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
याप्रकरणी रिझवान खाटीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एसटी बस चालक सुजित कुमार जाधव (पूर्ण नाव माहिती नाही) याच्या विरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राजकिरण झालटे पुढील तपास करत आहेत.









