यावल तालुक्यातील थोरगव्हाणजवळ घटना
यावल (प्रतिनिधी) :- येथील यावल आगाराची एस. टी. महामंडळाची बस मनवेल येथून शिरागड येथे जात असताना थोरगव्हाण येथील सबस्टेशन जवळ सिमेंटने भरलेल्या उभ्या ट्रकला बसचे ब्रेक फेल झाल्याने जोरदार धडक दिली. एसटीच्या समोरच्या काचेचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने प्रवाशांना कुठलीही इजा झाली नाही. यावल पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरु होते.
थोरगव्हाण येथील विज वितरण कंपनीचा सबस्टेशन पासून तर गावापर्यंत रस्ता कॉकीटीकरण काम सुरु आहे. या कामासाठी सिमेंटच्या पिशव्या भरलेला ट्रक रस्त्याच्या एका बाजूला उभा होता. त्यावेळी यावल आगाराची एसटी (एम. एच ४० वाय ५१९०) शिरागड गावाकडे जात असताना सिमेंटने भरलेल्या उभ्या ट्रक जवळ असताना ड्रायव्हरने एसटी बस थांबवून हॅण्ड ब्रेक लावून खाली उतरून ट्रकच्या ड्रायव्हरला एका बाजूने ट्रक लावा असे सांगण्यासाठी खाली उतरला.मात्र थांबलेल्या बसचे ब्रेक फेल झाल्याने बस ट्रकला धडकली. त्यामुळे समोरच्या बाजूचे काच फुटले. मात्र जीवीत हानी टळली .