यावल (प्रतिनिधी ) – एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरण होण्यासाठी सहा महिन्यांचा संप सुरु होता .त्यावेळी कंत्राटी चालक यांची भरती करण्यात आली होती. यासाठी अनेकांची नियुक्ती करण्यात आली. शासनाने त्यांना सेवा समाप्तीचे पत्रक दिल्याने या कंत्राटी चालकांवर सध्या उपासमारीची वेळ आली असून यांच्या निषेधार्थ कंत्राटी चालक मुंबई येथे उपोषणास बसणार आहेत.
संप काळात कत्राटी चालकांना दहावी पास प्रमाणपत्र , मेडिकल चाचणी , दोन दिवसीय चालक प्रशिक्षण हे तीन चाचणी पास कराव्या लागल्या. उत्तीर्ण झालेल्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच त्यांना एसटी ने २३ हजार ९०० पगाराचे परिपत्रक दिले होते . तर त्या संस्थेने कत्राटी चालकांना १२ हजार रुपये पगार अदा केले . तसेच विविध भत्ते देण्याचे आश्वासन दिले असतांना याचा लाभ कंत्राटी चालकांना मिळाला नाही. ८०० कंत्राटी चालकांना सेवासमाप्तीचे परिपत्रक दिल्याने आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून त्यांना कायमस्वरूपी एसटी महामंडळात नोकरी द्यावी अशी मागणी करण्यात आली असून याबाबत लक्ष वेधण्यासाठी कंत्राटी कामगार उपोषणाला बसणार आहे.