पाचोरा : -तालुक्यातील नगरदेवळा ही ग्रामपंचायत पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत असून शिवसेनेचा पारंपारिक बालेकिल्ला म्हणून हा जिल्हा परिषद गट ओळखला जात होता. परंतु ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपाचे १७ पैकी १० सदस्य निवडून आले आहेत. यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला आहे.
दि.१७ रोजी पार पडलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत प्रतिक्षा किरण काटकर यांची सरपंचपदी तर विलास राजाराम भामरे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी बिनविरोध निवडून आलेल्या सरपंच व उपसरपंचांसह नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार केला, तसेच गावात विकास कामेकरून नगरदेवळा गाव हे आदर्श गाव कसे करता येईल, या पद्धतीने लोकाभिमुख कामे करावी, असे मार्गदर्शन केले.याप्रसंगी प.स.सदस्य मंगलताई पवार, सिद्धार्थ पवार, आबा काटकर, नामदेवभाऊ पाटील, राजेंद्र महाजन, सुनील राऊळ, विनोद परदेशी,राजू पवार, संजय कुंभार, दिलीप चौधरी,सुनील महाजन,पंकज पाटील,महेश पाटील,सागर पाटील,बुधा भोई,गोविंद महाजन,पत्रकार बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.








