जळगाव (प्रतिनिधी)- न्युज 18 दुरचित्रवाणीचे निवेदक व संपादक अमिष देवगण यांच्या गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कोल्हे नगरातील रहीवासी पियुष कोल्हे व त्यांच्या सहकार्यांनी केली आहे.
रामानंद पोलिस ठाण्यात दिलेल्या निवेदनात पियुष कोल्हे यांनी नमुद केले आहे की, न्युज 18 दुरचित्रवाणीवर 16 जुन रोजी एका कार्यक्रमात अमिष देवगण यांनी मुस्लीम समुदायाचे संत हजरत ख्वॉजा गरीब नवाज यांच्याबद्दल आक्षेपार्ह उल्लेख करून समाजाच्या भावना दुखावल्या. समाजात धार्मीक तेढ निर्माण करण्याचा हा त्यांचा प्रयत्न अ सल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.







