जळगाव ;- आपल्या आजीसह भीक मागून पोटाची खळगी भरणाऱ्या १० वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणारा नराधमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील इंद्रप्रस्थ नगरमधून अवघ्या २४ तासांच्या आत अटक केली आहे . सौरभ वासुदेव खरडीकर (वय २५, रा. राधाकृष्ण नगर) असे या नराधमाच्या नाव असून त्याला शहर पोलीस स्टेशनला आणण्यात आले असून त्याने अत्याचार केल्याची कबुली दिली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , पिडीत मुलगी आपल्या आजीसोबत गोलाणी मार्केटसह इतर भागातून भिक्षा मागून उदरनिर्वाह होती. शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने गोलाणी मार्केटलगत असलेल्या हनुमान मंदिराच्या मागे उभे असलेल्या पिडीत मुलीला तुला खाऊ देतो म्हणून तिसऱ्या मजल्यावर नेले. त्यानंतर तिसऱ्या मजल्यावरील एका मुतारीत नेत त्या व्यक्तीने पिडीत मुलीवर पाशवी अत्याचार केला आणि त्यानंतर तेथून पळ काढला. पिडीत मुलगी रक्ताने माखलेल्या कपडयांवर रडत रडत खाली आपल्या आजीकडे आली आणि सर्व हकीगत सांगितली. त्यानंतर आजीने पिडीत नातीला सोबत शहर पोलीस स्थानक गाठले. पोलिसांनी गोलाणी मार्केटमधील दुसऱ्या मजल्यावरील बालाजी प्लेसमेंट बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता आरोपी त्यात पिडीत मुलीसोबत कैद झाला होता. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे सौरभ वासुदेव खरडीकर (वय २५, रा. राधाकृष्ण नगर) अशी आरोपीची ओळख पोलिसांना पटली. त्यानुसार त्याला आज दुपारी इंद्रप्रस्थ नगरमध्ये फिरत असतांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी तरुणाने आपल्या कृत्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण निकम यांनी दिली आहे.








