नांद्रा ता.पाचोरा(वार्ताहर)- ;- गेल्या दोन वर्षापूर्वी पुलवामा येथे सी.आर.पी.एफ.जवान यांच्या गाडीवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला १४ फेब्रुवारी ला दोन वर्ष पुर्ण झाले . त्यामुळे नांद्रा येथील नवतरुण ज्यांनी देशासाठी शहिद झालेल्या जवानाना आपले प्रेरणास्थान मानले आहे. त्यासाठी सैन्य दलात भरती होऊन मातृभूमिची सेवा करण्याचा चंग बांधला आहे . अशा शंभरीच्या जवळपास तरुणानी गाव टेकड्यावरील ज्या ठिकाणी ते व्यायाम व रनिंग करतात तेथे १४ फेब्रुवारी रोजी अमर जवान,भारत माता की जय अशा प्रकारे मोठी रांगोळी काढून त्यावर फुले ,दिवा व मेणबत्ती ठेऊन शहिदाना सामुहीक श्रद्धांजली वाहीली . १४फेबुवारीला पाश्चिमात्य संस्कृती व्हेलेटाईन डे चे अनुकरण न करता ,तरुणानी ब्लॅक डे म्हणून मातृभुमिवर शहिद झालेल्या जवानांच्या आठवणींना आपल्या मनोगतातून उजाळा देऊन,सामुहिक श्रद्धांजली वाहून सैन्य दलात भरती होऊन मातृभूमी व देशाचे पांग फेडले पाहिजे असा एक आदर्श परिसरात घालून दिला आहे.








