दुसऱ्या साथीदारालाही दुचाकींसह अटक
जळगाव ( प्रतिनिधी ) ;- जळगाव शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरणाऱ्या अट्टल गँगच्या ‘बांडुक’ नावाच्या प्रमुख चोरट्याला त्याच्या साथीदारांसह एलसीबीच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून चोरण्यात आलेल्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण असल्याने पोलीस अधीक्षक डॉ प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी जळगाव जिल्हयात चोरी होणारे मोटार सायकलचे गुन्हे तसेच चैन स्नॅचिंग चे उघडकीस आणणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना सुचना केल्या होत्या.त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक.किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील स.फौ.अशोक महाजन, पोहेकॉ.विजयसिंग पाटील,जितेंद्र पाटील,सुधाकर अंभोरे,अश्रफ शेख,नितीन वाविस्कर,प्रितम पाटील, राहुल पाटील, वसंत लिंगायत,उमेशगिरी गोसावी यांचे पथक रवाना केले होते.
पोलीस निरीक्षक .किरणकुमार बकाले यांना गोपनिय माहिती मिळाली की, शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील शुभम शिवराम मिस्त्री ( बांडुक गॅगचा प्रमुख ) हा त्याचे मित्रासोबत शनिपेठ पोलीस स्टेडान हद्दीत मोटार सायकली चोरी करीत आहे वरील पथक हे सदर आरोपीताचे शोध कामी आसोदा रेल्वे गेर कडील हरीओम नगर, कलावसंत नगर भागात शोध घेतला असता कलावसंतनगर कडुन रेल्वे गेट कडे जाणा-या रोडजवळ दोन बिना नंबर प्लेट असलेली मोटार सायकल वर दोन इसम प्रजापतनगरकडे जातांना दिसले तेव्हा त्यांना ताब्यात घेण्यात आले.
यात शुभम उर्फ बांडुक शिवराम मिस्त्री वय – २० रा.वाल्मीकनगर,जळगाव , राहुल रविंद्र कोळी वय – १९ रा.मेस्कोमातानगर अशी या दुचाकी चोरट्यांनी नवे आहेत . त्यांनी होंडा शाईन, पॅशन प्रो आणि आणखी एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली . याप्रकरणी शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शुभम उर्फ बांडुक श्रिवराम मिस्त्री याचे घरी अंगणात झाकुन ठेवलेली बजाज पल्सर जप्त करण्यात आली आहे.
संशयितांना पुढील तपास कामी शनिपेठ पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.