जळगाव – शिवजयंती उत्सवानिमित्त गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात आज सकाळी घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषीक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, सदस्या डॉ.केतकी पाटील, डॉ.अमृत महाजन ह्यांची प्रमुख उपस्थीती होती. मान्यवरांनी मनोगतातून शिवाजी महाराजांच्या पराक्रमांच्या गोष्टी सांगितल्या. शिवजयंती उत्सवानिमित्त निबंध स्पर्धा, कविता, चित्रकला, छायाचित्र स्पर्धा आयोजित केल्या होत्या. स्पर्धकांनी काढलेल्या चित्रातून कार्यक्रमाचा हॉल सजविण्यात आला तसेच गीत, पोवाडा, नाटिका आदि कार्यक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी बक्षीस वितरण सोहळा उत्साहात झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित साखरे, विक्रांत गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी श्रीवेद निकम, वैभव देशमुख, माधव मुरारका, ईश्वर कुदळ, मच्छींद्र हागवणे, कुणाल नाईक, सुमित राठोड, विकीता चौगले, प्राजक्ता जगताप, साक्षी ठाकरे, अपुर्वा कुलकर्णी, लावण्या वारीयर, मयुर जाधव, अभिजीत जाधव आदिंनी परिश्रम घेतले.
स्पर्धेचा निकाल
निबंध स्पर्धा – प्रथम पूनम सपकाळे, अभिषेक लग्गड, तृतीय उज्ज्वल देसले.
कविता स्पर्धा – प्रथम जान्हवी जाधव, द्वितीय अभिषेक जाधव, तृतीय श्रेयस पाटील
चित्रकला स्पर्धा – प्रथम शिवानी रसाळ, द्वितीय प्रियंका पंड्या, तृतीय आभा राऊत
छायाचित्र स्पर्धा – दिव्याणी चव्हाण