जळगाव : – जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण गेल्या काही दिवसांपासून थांबता थांबत नसू दररोज दोनशतकी आकडा कोरोना पॉझिटिव्ह येत आहे त्यामुळे जिल्हावासिणीयांमध्ये चिंतेचे वातावरण असून यामुळे आता कोरोनाबाधितांची ६ हजारीकडे वाटचाल सुरु झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५९६२ इतकी झाली आहे.
जळगाव शहर ८३ , जळगाव ग्रामीण -७,भुसावळ-६, चोपडा -३२, अमळनेर – ६, पाचोरा -० , भडगाव -८, धरणगाव- १५,यावल -१०,एरंडोल – ४, जामनेर- १२, रावेर -१३ पारोळा -२ , चाळीसगाव – ९, मुक्ताईनगर -३१ , बोदवड -० असे एकूण २३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्नांचे अहवाल प्राप्त झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
आजवर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ५९६२ इतका झालेला आहे. यातील ३५४२ रूग्ण बरे झाले आहेत. तर सध्या कोविड केअर सेंटरमध्ये-१४५२; कोविड हॉस्पीटलमध्ये-१३२ तर डेडीकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये ४६९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ८ मृत्यू झाले असून आजवरील एकुण मृतांची संख्या ३२९ इतकी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.