भाजपा शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव यांची मागणी
जळगाव ( प्रतिनिधी) ;- शासनाने निविदा काढून शिक्षकांचे प्रशिक्षणाच्या नावाखाली मूल्यमापन, कामगिरी व त्यानुसार वेतन असा विचार चालवला आहे. शिक्षकांना शासन गरज नसलेले कर्मचारी समजते कि काय. राज्य शासनाकडे केवळ शिक्षकच कर्मचारी आहेत का. शिक्षण विभागातील वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी धुडगूस घालून शिक्षक वर्गाला वेठीस धरत आहे. सदर निविदा प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होण्याची मागणी जिल्हाध्यक्ष भाजपा शिक्षक आघाडी जळगाव प्रवीण जाधव यांनी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना केली आहे.
संविधानिक दृष्ट्या किमान वेतन, भत्ते, लाभ, रजा, सेवानिवृत्ती व कर्मचार्यांना स्थैर्य तसेच आश्वस्त करण्यसाठी अश्या प्रकारच्या निविदा, योजना आणल्या पाहू जात आहे. शिक्षक विभागात शासनाचे कमी व प्रशासनाचेच शासन सुरु आहे. शिक्षण विभागाने शिक्षक प्रशिक्षण प्रणालीच्या नावाखाली राज्यातील समस्त शिक्षकांसाठी ३० कोटी रुपये खर्चून निविदा काढून काय चालविले आहे. त्यांचे हेतू तपासणे गरजेचे आहे. म्हणून या बड्या नौकरशाहीची चौकशी होऊन त्यांच्या वरच शासन व्हावे. अशा आशयाचे निवेदन भाजपा शिक्षक पदाधिकारी प्रवीण जाधव, दुष्यंत पाटील, किरण पाटील, संजय वानखेडे, निवृत्ती दानी, एस.बी.कुलकर्णी, सतीश भावसार, आनंद पाटील, विजय गिरनारे यांनी दिले.







