अलाहाबाद (वृत्तसंस्था ) ;- उत्तर प्रदेशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या भीतीमुळे विकेंड लॉकडाऊनची घोषणा योगी सरकारने केली आहे. राज्यात आठवड्यात दोन दिवस शनिवार आणि रविवार लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यूपी सरकारच्या मते, आता दोन दिवस संपूर्ण राज्यात लॉकडाऊन असणार आहे. याशिवाय आजपासून ज्या जिल्ह्यांमध्ये ५०० हून अधिक बाधित रूग्ण असतील, तेथे नाईट कर्फ्यूदेखील लागू केला जाईल.
राज्यात शनिवार व रविवार लॉकडाऊन असणार आहे. हा लॉकडाऊन शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ या वेळेत लागू असेल. त्याचबरोबर रात्रीच्या कर्फ्यूची वेळही रात्रीच्या ८ ते सकाळी ७ अशी असणार आहे.दरम्यान, या शनिवार व रविवार लॉकडाऊन दरम्यान विनाकारण घराबाहेर पडायला मनाई असेल तर केवळ आवश्यक क्षेत्राशी संबंधित लोकांनाच बाहेर पडण्याची परवानगी देण्यात येणार आहे. याशिवाय कोरोना लसीकरण, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांनाही सूट देण्यात येणार आहे.