कजगाव ता भडगाव ;- येथे सुवर्णकार समाजाचे आराध्यदैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली . यावेळी संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ नागरीक धनराज भालेराव यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आले. यावेळी सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष विजय पोतदार ,उपाध्यक्ष सुरेंद्र सोनार, सचिव रत्नाकर सोनार, विठ्ठल सोनार, सुरेश अहिरराव ,भगवान घोडके ,विलास भालेराव ,सुनील पोतदार ,पंढरीनाथ सोनार, संजय सोनार ,रमेश देवरे, विठ्ठल घोडके, पंकज दुसाने, विजय अहिरराव ,नितीन सोनार ,हिरालाल सोनार ,वीरेंद्र देवरे, अमोल सोनार ,गोविंद देवरे ,सचिन भालेराव ,अक्षय सोनार, शाम सोनार, सुनील सोनार ,सुनील पिंगळे ,शुभम सोनार, व महिला मंडळ उपस्थित होते . यावेळी कोरोना च्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम अत्यंत छोट्याखाणी पद्धतीने साजरा करण्यात आला. शासकीय नियम पाळून सामाजिक अंतर ठेवन्यात आले प्रत्येकाने मास्क चा उपयोग करून कार्यक्रमात हजेरी लावली होती यावेळी संजय सोनार कळवाडीकर यांनी सूत्रसंचालन केले.