जळगाव- थॅलेसेमिया बाधित आजारावर एकमेव उपचार म्हणजे बोनमॅरो ट्रान्सप्लांट होय. बोनमॅरो ट्रान्सप्लांटसाठी करावयाच्या HLA टायपिंग तपासणी करण्याचे शिबीर रेडक्रॉस आणि गोळवलकर रक्तपेढी संयुक्त विद्यमाने 18 मार्च रोजी रेडक्रॉस भवन, सिव्हील हॉस्पिटल शेजारी जळगाव. येथे आयोजित करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात प्रथमच हे शिबीर होत असून थॅलेसेमिया बाधित रुग्णांनी 11 मार्च पर्यंत नोंदणी करावी असे आवाहन डॉ. सई नेमाडें आणि डॉ प्रसन्न रेदासनी यांनी संयुक्त पत्रकार परीषदेद्वारे दिली
थॅलेसेमिया ह्या आजावरील एकमेव उपाय म्हणजे बोनमॅरो ट्रान्सप्लांट आणि त्यासाठी सुमारे १५ ते २० लाख इतका खर्च येतो. त्यापूर्वी करावयाच्या HLA टायपिंग तपासणी साठी सुमारे २० ते २५ हजार खर्च होतो. मात्र पंकजजी उधास ह्यांच्या पटूट संस्थेमार्फत एचएलए टायपिंग तपासणी पूर्णतः विनामुल्य करणार आहोत. या तपासणी शिबिरामुळे थॅलेसेमिया बाधित रुग्णांना दिलासा मिळणार आहे. शिबिरात रुग्णाचे आणि त्याच्या भाऊ बहिणीचे HLA टायपिंग तपासणी करण्यात येणार आहे. सकारात्मक HLA क्रॉसमॅचिंग झाल्यानंतर योग्य वेळी बोनमॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्याचे प्रयोजन केले जाईल. या शस्त्रक्रियेसाठी पटूट संस्थेमार्फत भरीव आर्थिक सहकार्य आणि मार्गदर्शन केले जाणार आहे.
जिल्ह्यात २०० हुन अधिक
थॅलेसेमिया मेजर चे जळगाव जिल्ह्यात २०० पेक्षा अधिक रुग्ण आहेत. ह्या रुग्णांना नियमित सतत रक्त द्यावे लागते. वेळेत उपचार मिळावेत व त्यांचा खर्च वाचवा ह्या उद्देशाने HLA क्रॉसमॅचिंग शिबिराचे आयोजन माधवराव गोळवलकर ब्लड बँक आणि इंडियन रेड क्रॉस ब्लड बँक ह्यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील सख्खे भाऊ , बाहीण असलेल्या थॅलेसेमिया रुग्णांनी १८ रोजी सकाळी ९ वाजता उपस्थित रहावे मात्र ११ मार्च पूर्वी रेडक्रॉस रक्तपेढी किंवा गोळवलकर रक्तपेढी मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे.
या संयुक्त पत्रकार परिषदेला रेडक्रॉस उपाध्यक्ष गनी मेमन, सचिव विनोद बियाणी सहसचिव राजेश यावलकर, रक्तपेढी सचिव अनिल कांकरिया, गोळवलकर रक्तपेढीचे उपस्थित होते .