पारोळा(प्रतिनिधी ) ;- जि. प.प्राथमिक शाळा धाबे ता.पारोळा चे राज्य आदर्श शिक्षक व मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व महात्मा ज्योतीराव फुले गुरु गौरव आदर्श पुरस्कार विजेते वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील हे दरवर्षी महात्मा ज्योतीराव फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शाळेत ” समता पंढरवडा ” चे आयोजन करतात . रोज या संदर्भात काही वेळ वेगवेगळे कार्यक्रम घेवुन या थोर महात्मांचे जीवनकार्य विदयार्थी व ग्रामस्थांसमोर मांडुन जागृती व समानतेची भावना निर्माण करतात .सध्या लॉक डाऊनमुळे हे शाळेत करता येत नसले तरी घरी व परिसरात राहणाऱ्या बालकांना त्यांनी याबाबत व्हॉटसअप द्वारा माहिती देणे सुरू ठेवले आहे .
आज महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेचे त्यांच्या पत्नी चित्रा पाटील यांनी पूजन करून पुष्पहार अर्पण केला . मुख्याध्यापक साळुंखे यांनी संदेश म्हणुन ” एक दिवा ज्ञानाचा ” लेखन करुन फलक लावला . त्यांची मुलगी सुप्रभा साळुंखे इने ” ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा ”
” एक दिवा समतेचा ” ” एक दिवा कोरोनाचा अंधार घालविण्याचा ” हे संदेश देणारी रांगोळी काढुन दिपक लावले .
मुख्याध्यापक साळुंखे यांचे घर बाजाराला लागुन असल्याने महत्वाच्या कामासाठी तिकडुन वापरणाऱ्यांनी अप्रूप वाटुन थांबुन महात्मा ज्योतीराव फुले यांना अभिवादन केले .
मुख्याध्यापक साळुंखे म्हणाले सर्व राष्ट्रपुरुष, राष्ट्रमाता, संत, महात्मे यांचे कार्य हे सर्व जगाच्याच कल्याणासाठी होते म्हणुन त्यांचे स्मरण व आदर्श हा धर्म, जातपात, पंथ, प्रांत,भाषा विरहित मानुन सदैव ठेवावे . त्याचीच आज संपुर्ण जगाला गरज आहे .