चाळीसगाव ;- पुण्यात प्लेगची साथ १८९७ पसरली होती. त्यात अनेक लोक बळी गेले. पुण्यात प्लेगची साथ पसरल्यानंतर १८९७ चा संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा लागू झाला होता. या कायद्यानुसार एखादी व्यक्तीला प्लेगचा आजार झाल्याची शंका आल्यास तिची इच्छा असो वा नसो, तिला सरकारी हॉस्पिटलात भरती केले जात असे. याच प्लेगाच्या साथीत अडकलेल्या लोकांचे हाल सावित्रीबाई फुले यांना सहन झाले नाहीत. त्यांनी प्लेगपीडितांसाठी पुणे शहराजवळील ससाणे यांच्या माळावर हॉस्पिटल सुरू केले. त्या स्वतः रोग्यांना धीर देऊ लागल्या. त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटू लागल्या. कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या.
हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे याच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रात एक आमदार असाही आहे ज्याने आपले सुसज्ज कार्यालयच रुग्णांसाठी मोफत दवाखाना सुरु करण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. ते आहेत चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण,
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार चव्हाण चाळीसगाव मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले. लोकांच्या सोयीसाठी त्यांनी अवघ्या २ महिन्यात ५ हजार स्क्वेअर फुट जागेवर सुसज्ज व वातानुकुलीत कार्यालय उभारले.
दुर्दैवाने कार्यालय सुरू होण्याच्या आतच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून २१ दिवसांचा लॉकडाऊन देशभरात सुरू झाला. अश्या परिस्थितीत ज्या जनतेच्या सेवेसाठी मी माझं कार्यालय उभारलं त्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी हे कार्यालय देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
आज राज्यासह देशात कोरोना विषाणूमुळे अभूतपूर्व अशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या आवाहनानुसार २१ दिवसांचा लॉकडाऊन भारतात पुकारण्यात आला आहे. एकमेकांपासून सुरक्षित अंतर व घरातच बसून राहिल्यास करोना विरोधातील ही लढाई भारतवासीय नक्की जिंकतील असा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वाना विश्वास आहे.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधीपक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानुसार व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आरोग्यदूत आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव तालुक्यातील सर्व स्तरातील रुग्णांच्या सोयीसाठी मोफत “जनसेवा क्लिनिक” सुरु केले आहे.
यात ४ वातानुकूलित तपासणी कक्ष यासह डॉक्टर व कार्यरत कर्मचाऱ्यांना करोना संसर्गापासून वाचण्यासाठी त्यांना प्रायव्हेट प्रोटेक्शन एकवीपमेंट (PPE) कीट दिली जाणार आहे. तसेच येणाऱ्या रुग्णांनी एकमेकांपासून अंतर राखावे, सोशल डीस्टसिंग राहावी यासाठी ओपीडी मध्ये 1 मीटरचे अंतर ठेवण्यात येणार आहे, तरी कुणीही घाबरून न जाता ज्यांना कुणाला तपासणी करायची असेल त्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, सोबत एक विनंती आहे की गर्दी होऊ नये यासाठी रुग्णांनी अतिशय गरजेचे असेल तरच सोबत नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्यांना आणावे, अन्यथा इतरांना क्लिनिक मध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तरी जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
स्थळ – आमदार मंगेश रमेश चव्हाण यांचे “अंत्योदय” जनसेवा कार्यालय, छ.शिवाजी चौक, करगाव रोड, चाळीसगाव
अधिक माहितीसाठी संपर्क – ०२५८९ – २२५५४४ / २२५५५५