सावदा ता, रावेर;- रावेर येथील ग्रामीण रूग्णालयात ड्युरा सिलेंडर उपलब्ध व्हावे यासाठी पोलिसांतर्फे मदत करण्यात आली आहे.
रावेर ग्रामीण रूग्णालयात डयुरा ऑक्सिजन सिलेंडर उभारण्यासाठी लोकसहभागाचे स्थानिक लोक प्रतिनिधी, प्रशासनाकडून मदतीसाठी जाहीर आवाहन करण्यात आले होते. त्यास समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उत्तम प्रतिसाद देत असून रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशन चे सपोनि स्वप्निल उनवणे, योगेश शिंदे, चालक सादिक शेख, अश्रफ शेख, वराडे, स्वप्निल पाटील, अब्बास तडवी, आणि सर्व पोलीस अंमलदार यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत ड्यरा सिलेंडरसाठी मदतीचा हात दिला आहे. त्यांचे सर्व समाजातून कौतुक होत आहे.








