यावल;- येथील शहरातील गंगा नगर क्षेत्रातील गंगेश्वर महादेव मंदिर परिसराच्या ठिकाणी ९ फेब्रुवारी रोजी ऑल इंडिया रेल्वे ऍक्ट अप्रेंटिस असोशियनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भरत परदेशी यांच्या उपस्थितीत यावल शहर तसेच तालुका रेल्वे अप्रेंटिस तरुणांची बैठक घेण्यात आली. बैठकीत दि. १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचे एकमताने ठरविण्यात आले.
बैठकीत दि. १२ फेब्रुवारी रोजी ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे महामंत्री शिवगोपाल मिश्रा यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारत भरातील रेल्वे अप्रेंटिस तरुण हे एक दिवसीय देशव्यापी, धरणें आंदोलन रेल्वेच्या डीआरएम व जीएम ऑफिसच्या समोर करणार आहेत.







