जळगाव ;-तालुक्यातील शिरसोली प्र. न . येथे खासगी लॅबच्या अहवालानुसार आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली असून आता रुग्णसंख्या १५ झाली आहे . जिलह्यात झपाट्याने रुग्ण वाढत असून आज सर्वाधिक रुग्ण चोपडा , रावेर ,धरणगाव , मुक्ताईनगर , अमळनेर , या तालुक्यात आज रुग्ण आढळले आहेत . यासंदर्भात सविस्तर माहिती प्रशासनाकडून देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .