चाळीसगाव भडगाव रस्त्यावरील वानरदेव येथील घटना
चाळीसगाव;- भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दुचाकीला जबर धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाल्याची घटना चाळीसगाव भडगाव रस्त्यावरील वानरदेव येथे आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली . डंपर मध्ये डांबर मिक्स खडी घेऊन जाणाऱ्या डंपर वाहन क्रमांक एम. एच. 43. बी.पी. 0659 ने आज दुपारी भरधाव वेगाने जात दुचाकी क्रमांक सीबीझेड असून वाहन क्रमांक एम. एच. 19 .ए .क्यू .3809 ला जोरदार धडक दिली . या धडकेत दोन जण जागीच ठार झाले . मयताची ओळख पटविण्याचे काम सुरु असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले . डम्पर चालकाने अपघातानंतर घटनास्थळाहून पळ काढला .