पाचोरा ;– येथील कोव्हीड सेंटर मधून तसेच पाचोरा येथील 1 रुग्ण व भडगाव येथील 9 रुग्णांना उपचारांअंती व वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित केल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये भडगाव तालुक्यातील एका सात महिन्याच्या बाळाचा देखील समावेश आहे. यावेळी आमदार किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर समाधान वाघ, विघ्नहर्ता हॉस्पिटल चे डॉक्टर भूषण मगर व वैद्यकीय पथक उपस्थित होते.
सकाळी १० वाजता विघ्नहर्ता हॉस्पिटल, कोरोना सेंटर मधुन दहा रुग्नाणा डीचार्जदेण्यात आला आहे . तरी नागरिकांनी घरीच रहा सुरक्षित रहा काळजी घ्या असे आव्हान आ किशोर पाटील ,डॉ भूषण मगर, वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ , डॉ अमित साळुंखे यांनी केले आहे .








