जळगाव । शहराजवळच्या कुसुंबा गावात जुगार खेळणार्यां 7 लोकांवर औद्योगिक वसाहत पोलीस स्थानकाच्या पथकाने धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले आहे. सुरेश मधुकर जोशी, आनंदा आत्माराम पाटील, अक्षय यशवंत पवार, अजय यशवंत पवार, रमेश गणेश राठोड, शुभम प्रकाशचंद्र राठी व मयुर राजेंद्र पाटील अशी या सात आरोपींची नावे आहेत ते जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर धाड टाकून त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी या जुगारींकडून दोन हजार १५० रुपयांची रोकड व जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.