जळगाव ( प्रतिनिधी ) ;- जळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये आज दुपारी पावणेपाच वाजेच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून उकाडा जाणवत असल्याने वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. सध्या केरळमध्ये मान्सून वेळेआधीच दाखल झाला असून राज्यात लवकरच मान्सून पाऊस दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने वर्तविले आहे.