जळगाव ( प्रतिनिधी ) सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा २५ मे रोजी श्री संत भीमा भोई यांची जयंती साजरा करण्यात आली. यावर्षी सुद्धा कोरोना महामारीचे संकट आले असून सर्व समाज बांधवांनी आपापल्या घरी श्री संत भीमा भोई यांचे प्रतिमेचे पूजन करून जयंती उत्सव साजरा केला. तसेच श्री बिजासनी भोईराज युवाशक्ती बहुउद्देशीय संस्थेमार्फत गरजू लोकांना जेवणाचे पाकीट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी भोई समाज क्रांती दलाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष हर्षल भोई व श्री बिजासनी भोईराज युवा शक्ती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष ललित भोई. उपाध्यक्ष स्मितेश जावरे व संस्था सचिव योगेश भोई यांनी उपस्थिती दिली . या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ समाज कार्यकर्ते चुडामण भोई. घनश्याम भोई. शिवाजी भाऊ भोई. योगेश जावरे. संजय भोई. संतोष जावरे. गणेश भाऊ भोई. अशोक भोई. नथू आप्पा भोई. रंजीत भोई. युवराज भोई. विपुल भोई आदी उपस्थित होते.