चाळीसगाव ;- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहरातील रिक्षांमध्ये चालक व प्रवाशी यांच्यामध्ये पारदर्शक पडदे लावलेला नसल्यामुळे रिक्षा चालकांवर शहर वाहतूक विभागाकडून आज सकाळ पासून कारवाई करण्यात येत होती. रिक्षा चालकांकडुन दंड आकारण्यात येत होता. सध्या कोविडमुळे लॉकडाऊनच्या परिस्थितीत ५० रिक्षा जमा करण्यात आल्या. या कारवाईने भीतीत असणाऱ्या सर्व रिक्षा चालकांनी आ. मंगेश चव्हाण यांच्याकडे समस्या सांगितली . आ. मंगेश चव्हाण यांनी तात्काळ रिक्षाचालकांना प्लास्टिक पारदर्शक पडदे उपलब्ध करून दिले.
अडचणीच्या वेळी कष्टकरी रिक्षाचालकांच्या मदतीला आमदार मंगेशदादा चव्हाण धावून आल्याने सर्व रिक्षा चालकांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, नगरसेवक भास्कर पाटील, सरचिटणीस योगेश खंडेलवाल, कैलास नाना पाटील, राहुल पाटील, संता पैलवान, अनिल कापसे व सर्व रिक्षाचालक उपस्थित होते.