जळगाव, (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कोरोना लसीकरण शिबिराचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थित आज ९ मे रोजी सिंधी कॉलनीतील चेतनदास मेहता रुग्णालय येथे प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी सुमारे दीडशेच्यावर पत्रकार बांधवांनी लस टोचून घेतली . दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून पत्रकारांना लस देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डाॅ रावलाणी,राज्य मराठी पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्यासह जेष्ठ पत्रकार व विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यात पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याने पत्रकार बांधवानी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान या शिबिरास जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्रीताई महाजन, ज्येष्ठ पत्रकार दीपक पटवे यांनी भेट दिली. दुपारी ४.१ ५ वाजेपर्यंत १६२ पत्रकार नोंदणीसाठी आले होते. दुपारी १५२ त्रकारांचे लसीकरण पूर्ण झाले यावेळी जेष्ठ पत्रकार विजय बापू पाटील, अशोक भाटिया, राज्य पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी लस घेतली.
मी “लसलशीत” झालो
पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींसाठी कोरोना लसीकरण शिबिर आयोजित करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन. एस. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चेतनदास मेहता रुग्णालय, सिंधी कॉलनी येथे रविवारी पत्रकारांसाठी लसीकरण शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये मी देखील कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला.
कार्यकारी संपादक
नरेश बागडे