चोपडा ;- चोपडा शहरातील उपजिल्हा रुग्णालयातून एकाची २० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.
प्रवीण भाऊराव बाविस्कर (वय-२०, रा.सत्रासेन ता.चोपडा )हे शेती काम करून आपला उदरनिर्वाह करतात त्यांच्याकडे शेतीच्या कामासाठी (एमएच 19, सीएस २७७०) क्रमांकाची दुचाकी आहे. उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या पार्किंगच्या ठिकाणी लावलेल्या त्यांची दुचाकी त्यांना दिसून आली नाही. परिसरात शोधाशोध करून दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी चोपडा शहर पोलीस ठाणे गाठले. प्रवीण बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक प्रमोद पाटील करीत आहे.








