जळगाव ;- येथील पत्रकार संतोष ढिवरे रा . अशोक किराणा , रामनगर यांचे आज दुपारी मुंबईतील जे.जे. रूग्णालयात उपचार सुरू असतांना निधन झाले.त्यांच्या निधनाची बातमी कळताच जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे .
संतोष ढिवरे यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून मुंबई येथील जे. जे. रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतांनाच आज दुपारी चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव रात्री उशीरा जळगावात आणले जाणार असून येथेच अंत्यसंस्कार होणार आहेत. संतोष ढिवरे यांच्या निधनाने जळगावच्या पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.








