नवी दिल्ली ;- केंद्र सरकारने ‘पोक्सो’ कायद्यात सुधारणा केली असून लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना यापुढे कठोर शिक्षा होणार असून तशी तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. हा कायदा देशभरात 9 मार्चपासून लागू करण्यात आला असून प्रकरणांची तक्रार करण्यासाठी 1098 ही हेल्पलाइनही सुरू करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने पोक्सो 2020 कायद्याची अधिसूचना जारी केली आहे. नव्या नियमानुसार शाळा आणि बालकांचे संगोपन करणाऱ्या इतर संस्थामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच राज्य सरकारला बाल संरक्षण नियम बनविण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. हे नियम बालकांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या सर्व संस्थांना लागू करण्यात आल्या आहेत. बालकांच्या वयोगटानुसार लैंगिक शिक्षणासाठी शैक्षणिक साधनसामग्री आणि अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे. अभ्यासक्रमात बालकांच्या सुरक्षितेसाठी विविध उपाययोजना सांगण्यात आल्या आहेत.