शिरसोली ता. जळगाव (प्रतिनिधी ) ;– शिरसोली प्र. न. ग्रा. पं . च्या सार्वत्रिक निवडणुकीत परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांच्या उद्या गुरुवारी प्रचाराचा नारळ फुटणार असून परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे . स्वामी समर्थ मंदिरापासून प्रचाराला सुरुवात होणार असून या निवडणुकीत वार्ड क्रमांक १ चे उमेदवार मधुकर प्रल्हाद आंबटकर , व आशाबाई संतोष माळी, वार्ड क्रमांक ४ चे उमेदवार नीलिमा योगेश बारी , ज्योती संजय सूर्यवंशी,निलेश प्रमोद वाणी ,वार्ड क्रमांक ५ चे उमेदवार ज्योतिबाई विलास माळी, अनिता उमाजी पानगळे . शेनफडू नामदेव पाटील वार्ड क्रमांक ६ चे सखुबाई विठाराम पाटील,मंगलाबाई ज्ञानेश्वर(नाना हवालदार ) मराठे, मुदस्सर बशीर पिंजारी असे परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांची नावे असून ते आपल्या झंझावाती प्रचाराला उद्या गुरुवारी ७ रोजी सकाळी सुरुवात करणार आहेत . यावेळी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मत इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केले आहे . परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून गावाचे विकासात परिवर्तन करण्याचे ध्येय डोळ्यासमोर असल्याचे उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले.